मुंबई

मुंबईत दोन दिवस पाणीबाणी

CD

मुंबईत दोन दिवस पाणीबाणी
१८ तास पुरवठा बंद; पाच विभागांना फटका
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २० : मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. २२) सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी (ता. २३) पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
​पाणीकपातीच्या या काळात नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सुरुवातीचे चार ते पाच दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत.
----
विभागनिहाय पाणी कुठे नाही?
​‘ए’ विभाग : पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, सीएसएमटी परिसर, सेंट जॉर्ज रुग्णालय, नौदल डॉकयार्ड आणि आरबीआय परिसरात बुधवारी पाणीपुरवठा बंद
‘​बी’ विभाग : उमरखाडी, नूरबाग, चिंच बंदर, मशीद बंदर, दाणा बंदर आणि वाडी बंदर परिसरात बुधवारी, तर महम्मद अली रोड, मशीद बंदर स्थानक परिसरात गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा बंद
​‘सी’ विभाग : दक्षिण मुंबईतील बोरा बाजार, एसबीयूटी क्षेत्र, सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि पाकमोडिया मार्ग परिसरात गुरुवारी पहाटेचा पाणीपुरवठा बंद
​‘ई’ विभाग : माझगाव कोळीवाडा, डॉकयार्ड रोड, काळाचौकी आणि घोडपदेव परिसरात बुधवारी, तर मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा परिसरात गुरुवारी पहाटे कमी दाबाने पाणीपुरवठा. जेजे, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयास कमी दाबाने पाणीपुरवठा
​‘एफ-दक्षिण’ विभाग : शिवडी, वडाळा आणि अभ्युदयनगर भागात गुरुवारी पाणी बंद. परळ, लालबाग, हिंदमाता आणि दादर परिसरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुवरठा. केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांतही १८ तास कमी दाबाने पाणीपुरवठा
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT