मुंबई

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक होणार

CD

महाराष्ट्र वैद्यकीय
परिषदेची निवडणूक होणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः सर्वोच्च न्यायालयाने सरकारची मागणी फेटाळून लावत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, सरकारने सुचवलेल्या नामनिर्देशित पद्धतीला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात डॉ. तुषार जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, निवडणूक घेणे आता बंधनकारक झाले असून, अनेक मतदान केंद्रे अद्याप निश्चित झालेली नाहीत. गेल्या वर्षी जानेवारीपासून सुरू असलेल्या गोंधळाबाबत सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे. सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक न घेता नामनिर्देशित पद्धत लागू करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील निवडणूक प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रतिनिधींची निवड करण्याची पद्धतही बंद होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व डॉक्टरांनी एकजुटीने उभे राहत सरकारच्या नामनिर्देशित पद्धतीला विरोध करावा, असे आवाहन डॉ. जगताप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT