मुंबई

विविध आरोग्य योजनांचे एकीकृत व्यवस्थापन करा

CD

विविध आरोग्य योजनांचे एकीकृत व्यवस्थापन करा
मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवते. या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी व सुलभ मदत मिळावी या दृष्टीने एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री शासकीय योजना मदत व समन्वय कक्ष’ संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत ‘मित्रा’चे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आदी विविध आरोग्य योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागील वर्षभरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख २२ हजार, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख १८ हजार रुग्णांचे अर्ज प्राप्त झाले असून, विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे.
...
‘वॉर रूम’ स्थापन
आतापर्यंत विविध योजनांद्वारे सुमारे ३,२४३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आरोग्य योजनांमधील रुग्णालये व लाभार्थी यांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य योजनांचे एकत्रीकरण करून एकीकृत आरोग्य लाभार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT