मुंबई

लीलावती रुग्णालय ट्रस्टला दिलासा

CD

लीलावती रुग्णालय ट्रस्टला दिलासा 
६५.६८ कोटी जमा करण्याचे इंडसइंड बँकेला आदेश 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : लीलावती रुग्णालयासह विश्वस्त संस्थेला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयाने इंडसइंड बँकेला ६५.६८ कोटी रुपयांची मुदत ठेव रोखीमध्ये रूपांतरित करून, ती रक्कम विश्वस्त संस्थेच्या युनियन बँक ऑफ इंडियामधील खात्यात हस्तांतरित करण्याचे आदेश नुकतेच दिले. 
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने ही रक्कम मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. इंडसइंड बँकेतील मुदत ठेव जून २०२४ मध्ये मॅच्युअर झाली होती. त्यानंतर विश्वस्त संस्थेने बँकेला ती रक्कम आपल्या युनियन बँकेच्या खात्यात जमा करण्याची विनंती केली होती; मात्र बँकेने वारंवार विविध कागदपत्रांची मागणी केली. जुलै २०२४ मध्ये विश्वस्तांमधील अंतर्गत वाद आणि निधी वितरित केल्यास बँकेवर संभाव्य दावे दाखल होण्याचा धोका असल्याचे कारण देऊन विश्वस्तपदाची पुष्टी करणारा सहधर्मादाय आयुक्तांचा आदेश बँकेने सादर करण्याची मागणी केली होती;  मात्र अशा आदेशाची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सांगत विश्वस्त करारनाम्यानुसार विश्वस्तांना असलेले अधिकार अधोरेखित केले.
तथापि, बँकेने सहधर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची आपली मागणी कायम ठेवल्याने विश्वस्त संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सांगितले. दुसरीकडे विश्वस्तांमधील वाद धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याने, सहधर्मादाय आयुक्तांचा आदेश मिळवणे बँकेला आवश्यक वाटले आणि म्हणूनच ती रक्कम विश्वस्त संस्थेच्या खात्यात जमा केली नसल्याचा दावा बँकेने केला.
---
न्यायालयाचे म्हणणे बँकेला मान्य
विश्वस्त संस्थेने न्यायालयासमोर एक हमीपत्र दाखल करावे आणि त्यामध्ये युनियन बँकेचे खाते हे केवळ विश्वस्त संस्थेच्याच नावाने असून, त्यावर केवळ विश्वस्त संस्थेचीच मालकी असल्याचे स्पष्ट करावे, असेही बँकेने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने घेतली. न्यायालयाने बँकेचे हे म्हणणे मान्य केले व ट्रस्टला हमीपत्र दाखल करण्याचे आदेश देऊन याचिका निकाली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

Latest Marathi News Update: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरण

Gold Rate Today: RBIच्या निर्णयानंतर आज मोठी घसरण! 8 दिवसांत सोन्याचे भाव कोसळले; चांदीही स्वस्त, महाराष्ट्रात आजचा भाव किती?

भारताच्या आर. प्रज्ञानंदने Norway Chess चे विजेतेपद जिंकून घडवला इतिहास! १४ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT