मुंबई

महापालिका सभागृहाचे कामकाज आता ‘लाईव्ह’

CD

महापालिका सभागृहाचे कामकाज आता ‘लाइव्ह’
नगरसेवकांच्या कामगिरीवर थेट नजर; सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकाही स्पष्ट होणार

मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे सोमवारपासून (ता. २०) थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका सभागृहात कसे कामकाज होते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक तसेच आपण निवडून दिलेला नगरसेवक कशाप्रकारे पालिकेचे कामकाज करतात हे मुंबईकरांना आता कळू शकेल.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौरांच्या अपमान नाट्यावर शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडला असताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यास समर्थन दिले; मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबत किशोरी पेडणेकर यांनी जे एक वक्तव्य केले होते, त्या वेळी त्यावर भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे पालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये मोठी चकमक झाली आणि रणकंदन झाले होते. त्या वेळी किशोरी पेडणेकर यांनी, नेमके काय वादग्रस्त वक्तव्य केले, हे सभागृहात थेट प्रक्षेपण सेवा उपलब्ध नसल्याने उघड होऊ शकले नाही. त्यानंतर त्याच दिवशी महापौर रितू तावडे यांनी, २४ तासांत पालिका सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत घोषणा केली होती; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता महापालिका सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू झाले. त्यामुळे पालिकेतील कामकाजात पारदर्शकता ठेवण्यात मदत होणार आहे.

ठाकरे गट, काँग्रेसची मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक हैदर अली असलम शेख यांनीही तशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT