एल्फिन्स्टन पूलबाधितांना दिलेल्या घरांच्या दुरुस्ती खर्चावर म्हाडा सोडणार पाणी
एक कोटी ७५ लाख रुपये देण्यास एमएमआरडीएची नकारघंटा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : एल्फिन्स्टन पूलबाधितांना दिलेल्या घरांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च आणि लक्ष्मी निवास, हाजी नुराणी या सेस चाळींवर म्हाडाने सुमारे एक कोटी ६७ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यावर आता म्हाडाला पाणी सोडावे लागणार असल्याचे दिसत आहे. हा खर्च देण्यास एमएमआरडीएने नकारघंटा दाखवली असून त्याला म्हाडाकडूनही होकार दिला आहे. त्यामुळे एरवी सामान्यांकडून पै-पै वसूल करणारे म्हाडा एवढे उदार का होत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई शहरातील जुन्या सेस चाळी आणि इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी म्हाडावर आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाला लागून असलेल्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन चाळी सेसमध्ये येत आहेत. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीवर म्हाडाने आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, या चाळी एल्फिन्स्टन पुलाच्या उभारणीमुळे बाधित होत असल्याने येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता एमएमआरडीएने म्हाडाकडून ७८ घरे घेतली असून संबंधित रहिवाशांना दिली जाणार आहेत. या घरांच्या दुरुस्तीवर म्हाडाने लाखो रुपये खर्च केला आहे. त्याच्या वसुलीसाठी सुरुवातीला म्हाडा आग्रही होते. त्यानुसार एमएमआरडीएला पत्रही दिले होते. दरम्यान, म्हाडा आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हे पावणे दोन कोटी रुपये माफ करण्याची तयारी म्हाडाने दर्शवली असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
७६ लाख रुपये केले वसूल
एमएमआरडीएने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून म्हाडाने धारावीत स्कायवॉक उभारला आहे. त्याचे पालिकेकडे हस्तांतरण करताना पालिकेने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून देण्याची किंवा त्या बदल्यात ७६ लाख रुपयांची म्हाडाकडे मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाने ही रक्कम नुकतीच भरली आहे. सरकारी संस्था असल्याने म्हाडाने एमएमआरडीएला कोट्यवधी रुपये माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. मग म्हाडाही सरकारी संस्थाच आहे, मग पालिकेने लाखो रुपये माफ का केले नाहीत, असा सवाल म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.