मुंबई

वृद्ध गृहिणी आभासी अटकेत

CD

वृद्ध गृहिणी आभासी अटकेत
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप करीत ७.५० लाख उकळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : तुम्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा संशय आहे, असा बनाव करीत सायबर भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवत केलेल्या आरोपांमुळे मुलुंड येथे राहणारी ७० वर्षीय वृद्ध गृहिणी भेदरली आणि आभासी अटकेत पडली. ही संधी साधून भामट्यांनी या वृद्धेकडून ७.५० लाख रुपये उकळले.
उरल्यासुरल्या आयुष्याचा आधार एका झटक्यात गमावल्याने वृद्धा गर्भगळीत झाली. आधीच विवाहित मुलीला विश्वासात घेऊन का चर्चा केली नाही? यामुळे फसवणूक टळली असती, अशा पश्चातापाच्या भावनेतून अद्याप ती सावरू शकलेली नाही.
पालिकेत नोकरी करणाऱ्या पतीच्या निधनानंतर तक्रारदार वृद्धा मुलुंडच्या घरी एकटीच राहते. पतीच्या निम्म्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अलीकडेच त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉलवर संपर्क साधून सक्तवसुली संचालनालय (ईडी)चे अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्या बँक खात्यातून अडीच कोटींचे व्यवहार झाले आहेत. ही रक्कम दहशतवाद्यांनी घातपाती कारवायांसाठी वापरल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी तुम्हाला अटक करावी लागेल, अनोळखी व्यक्तीचा हा आरोप ऐकताच वृद्धेला घाम फुटला.
थोडे सावरत वृद्धेने इतके पैसे माझ्याकडे कसे येतील? मी गृहिणी आहे. तुमचा गैरसमज झाला आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर काही कागदपत्रे पाठवली. त्यात बँक व्यवहारांचे तपशील होते. आपले नाव, बँक खाते क्रमांक आणि त्यावरून झालेले अनाकलनीय व्यवहार पाहून त्या संभ्रमित झाल्या.
पुढील तपासासाठी बँकेतील सर्व रक्कम तातडीने देऊ त्या बँक खात्यावर वळती करा, अशी सूचना भामट्यांनी केली. ऑनलाइन व्यवहार जमत नसल्याने वृद्धेने आरटीजीएसद्वारे ७.५० लाख रुपये पाठवले.

पोस्‍टातील मुदत ठेव मोडण्यास सांगितले
भामट्यांनी वृद्धेला पोस्टातील मुदत ठेव मोडून पैसे पाठवण्यास सांगितले. तेव्हा मात्र वृद्धेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. न पटणारे आरोप, त्यात झालेली आभासी अटक, पैशांच्या मागणीबाबत वृद्धेने आपल्या विवाहित मुलीशी चर्चा केली. तेव्हा आई तुझी फसवणूक झाली, असे मुलीने थेट सांगितले. आभासी अटक वगैरे काहीही नसते. त्यानिमित्ताने सायबर भामटे लूटमार करतात, ही बाब समजावून सांगताच वृद्धेने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT