‘तेथे’ तातडीने सीसीटीव्ही बसवा
अध्यक्षा मीनल तुर्डे यांचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : दादर येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा, असे कडक निर्देश महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांनी दिले आहेत. तसेच, संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या गळतीची दुरुस्ती करून मुंबईकरांनी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
१५ एप्रिलला झालेल्या नियोजन विभागाच्या बैठकीनंतर अध्यक्षांनी जलतरण तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. तलावाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले; मात्र काही ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. गळतीमुळे खराब झालेला स्मृती दालनाचा भाग दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.
यापूर्वी महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना मीनल तुर्डे यांनी स्पष्ट केले, की महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, ही पालिकेची प्राथमिकता आहे. पालिकेच्या ‘जेंडर बजेट’अंतर्गत पाच टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी राखीव असून, बचत गटांना खेळते भांडवल आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांना ‘बेस्ट’ प्रवासात ५० टक्के तर दिव्यांगांना १०० टक्के प्रवास सवलत देऊन महापालिका आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.