युसूफ पठाणच्या
नातेवाईकांना अटक
मुंबई ः माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या तीन नातेवाईकांना भायखळा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यात पठाणचे सासरे, मेव्हण्याचा समावेश आहे. आरोपींवर किरकोळ कारणावरून दोन व्यक्तींना अमानुष मारहाण आणिकारची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
युसूफ खान आणि सलमान अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी खान आपल्या कारने जात असताना शोएब नावाच्या व्यक्तीवर खड्ड्यात साचलेले पाणी उडाले. खान यांनी त्याबद्दल माफी मागितली; मात्र शोएबने खान यांच्या कारची तोडफोड केली तसेच त्यांना मारहाणही केली. याबाबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात असताना युसुफ पठाणचे सासरे खालिद खान, मेव्हणा उमरशाद व अन्य साथीदारांनी तक्रारदार खान यांना पुन्हा अमानुष मारहाण केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणात हा सर्व प्रसंग कैद झाला असून आरोपींचे चेहरे आणि कृती स्पष्ट दिसते आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्या आधारे पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.