गवत पेटल्याने
वाहतूक विस्कळीत
मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगतच्या वाळलेल्या गवताला मंगळवारी सायंकाळी आग लागली. या घटनेमुळे संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला असून अनेक गाड्यांना विलंब झाला. ही घटना सायंकाळी ६:३५ वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ७:२० वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. या घटनेमुळे काही मेल-एक्सप्रेस गाड्या तसेच उपनगरीय लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.