मुंबई

विरोधकांचे महिलाप्रेम ‘पुतना मावशी’चे!

CD

विरोधकांचे महिलाप्रेम ‘पुतना मावशी’चे!
डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

​मुंबई, ता. २२ : ‘नारीशक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांना घराण्याचा वारसा मिळाला आहे. त्यांना महिला आरक्षणाचे वावडे आहे. या दोघींचे महिलाप्रेम म्हणजे ‘पुतना मावशी’चे प्रेम आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
‘बाळासाहेब भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी काँग्रेसवर प्रहार केला. राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांच्या न्याय हक्कांना डावलले. त्यांनी केवळ धनदांडग्यांची बाजू घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये कायद्यात सुधारणा करून मुस्लिम भगिनींना पोटगीचा अधिकार मिळवून दिला. १९८६ मध्येच आरक्षण मिळाल्याचा काँग्रेस खासदारांचा दावा असत्य असल्याचे सांगितले. आरक्षण आधीच मिळाले होते, तर १९९६ मध्ये पुन्हा विधेयक आणण्याची गरज का पडली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
----
काँग्रेसला महिला आरक्षण नको!​
भारतीय संसदेत महिलांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. रवांडा (६४ टक्के) आणि क्युबा (५७ टक्के) यांसारख्या देशांचे उदाहरण देत, काँग्रेसला पुढील ४० वर्षे महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करून काँग्रेस महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या आड येत असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Haveli News : १५ वर्षांनंतर यशवंत साखर कारखान्याच्या जमिन विक्रीला मुहूर्त; पुणे बाजार समितीकडून ४९.१८ एकर खरेदी

'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

काळाचा थरकाप उडवणारा दिवस! माळीण दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार!

बँकेपेक्षा जास्त व्याज, जोखीम शून्य! पोस्ट ऑफिसपासून PPF पर्यंत... 'या' ५ सरकारी योजनांमध्ये मिळतोय आकर्षक परतावा

IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून

SCROLL FOR NEXT