मुंबई

‘कोस्टल’चा खर्च १५ हजार कोटींवर

CD

‘कोस्टल’चा खर्च १५ हजार कोटींवर
एन. एस. मार्गाच्या कामामुळे पालिकेवर ६० कोटींचा बोजा
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोड (सागरीकिनारा मार्ग) प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मरीन ड्राइव्ह येथील एन. एस. रोडला समांतर असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आता ६० कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत. या वाढीव खर्चासह प्रकल्पाचा एकूण खर्च आता १४ हजार ९७७ कोटींवर पोहोचला असून, तो लवकरच १५ हजार कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचा मूळ आराखडा तयार झाला तेव्हा त्याचा खर्च १२,७२१ कोटी रुपये अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात काम करताना अनेक आव्हाने समोर आली. ताज्या माहितीनुसार, मरीन ड्राइव्ह येथील समांतर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ५९ कोटी ८५ लाखांचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला. कोणत्याही प्रकारची चर्चा न होता तो काही मिनिटांतच मंजूर करण्यात आला. कंत्राटदाराला ही रक्कम अदा केल्यानंतर खर्चातील ही सातवी सुधारणा असणार आहे.
----
खर्चात मोठी वाढ
प्रकल्प सुरू झाल्यापासून अनेक कारणांमुळे खर्चात भर पडली आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार पुलाच्या दोन खांबांमधील अंतर वाढवण्यासाठी ९२२ कोटींचा अतिरिक्त खर्च झाला. समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी नवे टेट्रापॉड बसवणे, हाजी अली येथे बहुमजली वाहनतळ उभारणे आणि बोगद्यातील अत्याधुनिक वायूविजन प्रणालीत केलेल्या सुधारणेमुळे खर्चात मोठी वाढ झाली.
​----
अडीच हजार कोटींचा जादा खर्च
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे अशा १०.५८ किमीच्या या मार्गाचा मोठा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असली तरी मूळ अंदाजापेक्षा प्रकल्प खर्च तब्बल दोन हजार २५५ कोटींनी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT