शिवसेनेच्या १२ मंत्र्यांवर
२२ जिल्ह्यांची जबाबदारी
निवडणुकीसाठी पक्षसंघटना बळकटीवर भर
मुंबई, ता. २२ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २२ जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ‘संपर्कमंत्री अभियान’ आखले आहे. त्यानुसार पक्षसंघटना बळकट करण्यासाठी १२ प्रमुख मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मागील निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होती; मात्र या वेळी पहिला क्रमांक मिळवण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्ट निश्चित करा आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पूर्ण ताकद द्या, असा सल्ला शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. या मोहिमेत केवळ निवडणूक लढवणेच नव्हे, तर सत्तेची पकड घट्ट करण्यावरही भर देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थानिक शाखाप्रमुखांपर्यंत निधी पोहोचवून विकासकामांचा धडाका लावण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.
.......
मंत्र्यांकडील जिल्हावार जबाबदारी
गुलाबराव पाटील : जळगाव, नंदुरबार
उदय सामंत : नाशिक, अहमदनगर
योगेश कदम : ठाणे, पालघर
दादा भुसे : धुळे, बुलढाणा
शंभुराज देसाई : गडचिरोली, चंद्रपूर
संजय राठोड : यवतमाळ, वाशिम
संजय शिरसाट : भंडारा, गोंदिया
प्रतापराव जाधव : नागपूर, वर्धा
प्रताप सरनाईक : अमरावती, अकोला
भरत गोगावले : बीड
आशीष जयस्वाल : जालना
प्रकाश आबिटकर : नांदेड, हिंगोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.