मुंबई

अधिकृत विक्रेत्यांकडून बस मालकांची लूट

CD

अधिकृत विक्रेत्यांकडून बसमालकांची लूट
सुरक्षा उपकरणांसाठी दुप्पट दर; शालेय बस असोसिएशनचा संताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या शालेय बसचालकांवर शुल्क मर्यादा लादल्या जात असताना, अनिवार्य सुरक्षा उपकरणांच्या किमतींवर कोणतेही नियंत्रण नसल्याने बसमालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केला आहे.
अधिकृत विक्रेते आणि बस उत्पादकांकडून ही उपकरणे बाजारभावाच्या दुप्पट दराने विकली जात असल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, जीपीआरएस, वाहन स्थान शोधक यंत्र, आग शोध व नियंत्रण प्रणाली, वेग मर्यादक यंत्र, चालक दलाची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय तंदुरुस्ती, पोलिस पडताळणी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद, चालक प्रशिक्षण आणि पोक्सो जनजागृती हे सर्व नियम २०१९ पासून लागू असून, त्यांचे काटेकोर पालन केले जात आहे.
तथापि, अग्निशमन व नियंत्रण प्रणाली, वेग नियंत्रक आणि वाहन स्थान शोधक यंत्र यांसारख्या अनिवार्य सुरक्षा उपकरणांच्या किमतीत मोठी तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. एआरएआय, डीआरडीओसारख्या सक्षम संस्थांकडून तपासलेली आणि एआयएस-१३५ मानकांनुसार प्रमाणित उपकरणे खुल्या बाजारात ८० ते ९० हजार रुपयांत उपलब्ध असताना, हीच उपकरणे अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करताना १.८० लाख रुपये किंवा त्याहून अधिक दराने विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारने शालेय बसचालक संघटनेची चर्चा करून  प्रस्तावित केलेल्या  शुल्क मर्यादा नियमावलीवर पुनर्विचार करावा.  अनिवार्य सुरक्षा उपकरणे आणि साधनांसाठी किंमत नियमन लागू करावे.  विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक चालकांची आर्थिक स्थिरता या दोन्हींचे रक्षण करणारा  दृष्टिकोन ठेवावा. 
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT