आरटीओ कार्यालयांमध्ये दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट
संपावर तोडगा नाहीच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे बुधवारी चारही आरटीओ कार्यालयांमध्ये पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला.
एरवी लोकांच्या गर्दीने आणि वाहनांच्या आवाजाने हा परिसर गजबजलेला असतो. संपामुळे कामासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी तोडगा न निघाल्याने गुरुवारीही संप कायम राहणार आहे. आरटीओ कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडे असले तरी कामाच्या खिडक्यांवर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. परवाना विभाग, वाहन नोंदणी आणि कर संकलन विभाग या सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंदच राहील, असा पवित्रा कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. आज होणाऱ्या सर्व लर्निंग लायसन्स चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या. तसेच नवीन वाहनांच्या नोंदणीचे काम रखडले आहे. संपामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.