मुंबई

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर लक्ष!

CD

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर लक्ष!
मुंबईकरांच्या तक्रारींची दखल; स्थायी समिती अध्यक्ष मैदानात
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : पावसाळा तोंडावर असूनही मुंबईतील रस्त्यांची कामे रखडलेलीच असल्याने, आता प्रशासनावर वचक बसवण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईतील विविध भागांत सुरू असलेल्या रस्ते कामांमधील अनियमितता आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
​ ​महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी १५ एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, अनेक ठिकाणी या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. ३१ मेपर्यंत काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण करण्याचे लक्ष असले, तरी सद्यःस्थितीत कामांचा वेग आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
​ ​स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी गोरेगाव पूर्व, गोकुळधाम परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला.​ साई कुटीर मार्ग आणि यशोधाम भागातील रस्ते कामात सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.​ कामामुळे स्थानिकांना चालणे आणि वाहन चालवणे कठीण झाले असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
​नगरसेविकांच्या मागणीवर तातडीने प्रतिसाद देत प्रभाकर शिंदे यांनी केवळ गोकुळधामच नव्हे, तर मुंबईतील इतरही वादग्रस्त ठरलेल्या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले.​ केवळ गोकुळधामच नाही, तर ज्या ज्या प्रभागांतून रस्ते कामांबाबत तक्रारी येतील, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः भेट देईन. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यात कसूर झाल्यास संबंधितांना सोडले जाणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

कामांना गती मिळणार
​दरवर्षी पावसाळ्यात मुंबईचे रस्ते खड्डेमय होतात. यंदा काँक्रीटीकरणाचा दावा केला जात असला तरी, कामाच्या ठिकाणी सुरू असलेला गोंधळ मुंबईकरांची चिंता वाढवणारा आहे. आता अध्यक्षांच्या या पाहणी दौऱ्यामुळे रस्ते कामांना गती मिळणार का आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळला

Pune Crime: पुण्यात MBBS प्रवेशाच्या नावाखाली ४० जणांना गंडा, लाखोंची फसवणूक; ऑर्थर रोड जेलमधून आरोपी ताब्यात

Monsoon El Nino Impact : विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात अलनिनोचा प्रभाव तीव्र; मॉन्सूनवर परिणाम, हवामान विभागाने व्यक्त केली चिंता

Sagrada Familia: युरोपचा ताजमहाल – सरगदा फॅमिलिया

Bidar Sisters Death : धक्कादायक! आंबा खाल्ल्यानंतर आईसह 5 मुलींना उलट्या-जुलाब; दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT