मुंबई

सायबर गुन्ह्यांसाठी ‘एपीके’ची विक्री

CD

सायबर गुन्ह्यांसाठी ‘एपीके’ची विक्री
आरोपी झारखंडचे, बिहारमधून अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : व्हॉट्सॲप मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून बनावट एपीके फाईल पाठवून नंतर संबंधितांच्या मोबाईलचा ताबा घेत बँक खाती रिकामी करण्याचा प्रकार सायबर गुन्हेगारीत वाढला आहे. या एपीके फाईल तयार करून देशभरातील भामट्यांना विकणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी बिहारमधून बेड्या ठोकल्या.
महानगर गॅस कंपनीच्या नावे बनावट मेसेज आणि त्याद्वारे एपीके फाईल पाठवून नागरिकांना लुटण्याचे सत्र शहरात सुरू आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाईमुळे यानिमित्ताने होणारी फसवणूक शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच भामट्यांनी वांद्रे येथील एका वृद्धाकडून अशाच प्रकारे २.३५ लाख रुपये परस्पर उकळले. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर प्रयोगशाळेतील उपनिरीक्षक धनवेश पाटील यांनी एपीके फाईलचे तांत्रिक विश्लेषण करून झारखंड येथील आरिफ अन्सारीचा सहभाग स्पष्ट केला. त्यानुसार सायबर पथक झारखंड येथे धडकले; मात्र आरिफ तेथून पसार झाला होता. पथकाने झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांत त्याचा पाठलाग केला. अखेर बिहारमधून आरिफसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली.
----
फसवणुकीचे तंत्र
आरोपींच्या मोबाईल विश्लेषणात त्यांनी एपीके फाईल तयार करून देशभर विकल्याचे आणि फसवणुकीसाठी अनेकांना पाठवल्याचे पुरावे उघड झाले. सायबर गुन्ह्यांविरोधी लढ्यातील ही मोठी कारवाई मानली जाते. आजवर बँक खाती पुरवणाऱ्या तळातील आरोपींपर्यंत मर्यादित असलेले अटकसत्र या कारवाईमुळे थेट सायबर भामट्यांना फसवणुकीचे तंत्र पुरवण्यांपर्यंत पोहोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT