मुंबई

महामुंबईत उकाडा वाढणार

CD

महामुंबईत उकाडा वाढणार
काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

मुंबई, ता. २३ : मुंबईसह उपनगरे आणि लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, २३ ते २७ एप्रिलदरम्यान या भागांत उष्णतेचा तडाखा जाणवणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
​​मुंबईत २३ एप्रिलपासून उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः २४ एप्रिलला मुंबईत दुपार किंवा संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे; मात्र त्यानंतर पुन्हा हवामान कोरडे राहून उकाडा वाढण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्ण आणि दमट वातावरण असेल. २४ आणि २५ एप्रिलला दुपारच्या वेळी हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ एप्रिलनंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्यात २७ एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहील. येथे प्रामुख्याने उष्णतेचा प्रभाव जास्त जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
----
ढगाळ वातावरणानंतर तापमानात वाढ
​पुढील चार-पाच दिवस आर्द्रता जास्त असल्याने नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. केवळ २४ आणि २५ एप्रिलला काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. त्यानंतर पावसाची शक्यता कमी होऊन हवामान पुन्हा पूर्णपणे कोरडे होईल. परिणामी, तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT