महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच!
मुंबई, ता. २३ : मध्य रेल्वेच्या भरती परीक्षेत (जीडीसीई) मराठीचा पर्याय उपलब्ध केल्यानंतर, महाराष्ट्रात मराठी भाषा अपरिहार्यच आहे. प्रशासनाने ही बाब कायम लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगितले.
रेल्वेच्या भरती प्रक्रियेतून मराठीला डावलण्यात आल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. या पाठपुराव्याला यश आल्यावर अमित ठाकरे म्हणाले, हा केवळ आमचा विजय नसून स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा आणि मराठी अस्मितेचा विजय आहे. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरल्यावरच प्रशासनाला जाग का येते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने स्वतःची जबाबदारी ओळखून मराठीचा समावेश आधीच करणे अपेक्षित आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.