मुंबई

एक्स्टॅसी विकत घेणारे रडारवर

CD

नेस्को प्रकरण
----
एक्स्टॅसी विकत घेणारे रडारवर
व्यवहारांचे तपशील पोलिसांकडे
मुंबई, ता. २३ ः नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात अटकेतील आरोपींकडून एक्स्टॅसी ड्रग्ज खरेदी घेणारेही वनराई पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यातील प्रत्येकाकडे पोलिस चौकशी करणार आहेत. विशेष म्हणजे ड्रग्जविक्रेत्या टोळीला ऑनलाइन पैसे पाठविणाऱ्या सर्व ग्राहकांचे तपशील पोलिसांकडे उपलब्ध झाले आहेत. रोख रक्कम देऊन नशेच्या गोळ्या विकत घेणाऱ्यांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
कॉन्सर्टमध्ये एक्स्टॅसी विकणाऱ्या आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल आणि मुख्य आरोपी आयुष साहित्य यांनी मिरा-भाईंदर येथील जिया रिचेल जेकब हिच्या खात्यावर ४.३७ लाख रुपये वळते केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिया अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी धडपडत असून, ती स्वतः ११ एप्रिल रोजी नेस्को केंद्रात आयोजित कॉन्सर्टमध्ये सहभागी होती. तिनेही एक्स्टॅसीचे सेवन केले होते. महेश खेमलानी उर्फ मार्क या व्यक्तीच्या सूचनेवरून आरोपींनी जियाच्या खात्यावर वळती केली.
----
पोलादपुरातून ९३३ गोळ्या जप्त
दरम्यान, कॉन्सर्टमध्ये एक्स्टॅसीच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच, आरोपी आयुष अटक टाळण्यासाठी एक्स्टॅसीचा साठा घेऊन गोव्याला पसार होण्याच्या बेतात होता. तो पोलादपूरपर्यंत पोहोचला; मात्र रायगड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी पाहताच त्याने एक्स्टॅसीचा साठा पोलादपूर येथे फेकला. चौकशीत ही माहिती मिळताच, वनराई पोलिसांनी आयुषला पोलादपूर येथे नेले आणि संबंधित ठिकाणी ९३३ गोळ्या सापडल्याचा दावा पोलिसांनी केला. त्याची किंमत १५.३९ लाख असल्याचे सांगण्यात आले.
----
यापूर्वीही विक्री
या पार्श्वभूमीवर आयुष व टोळीने कॉन्सर्टमध्ये मुक्तपणे एक्स्टॅसीची विक्री केलीच; पण यापूर्वीदेखील ही टोळी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकत होते, ही बाब स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जिया आणि आयुष एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांनी या गोळ्या कोणाकडून विकत घेतल्या, कोणाकोणाला विकल्या, याबाबत वनराई पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT