मुंबई

सतर्क वाहतूक पोलिसांमुळे शस्त्र हस्तगत

CD

शस्त्रासह दोन तरुणांना अटक
सतर्क वाहतूक पोलिसांमुळे शस्त्र हस्तगत

मुंबई, ता. २३ ः सतर्क वाहतूक पोलिसांमुळे छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईत अवैधरीत्या शस्त्र घेऊन आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी अँटॉप हिल परिसरात करण्यात आली.

वाहतूक पोलिस शिपाई प्रभाकर पवार आणि शरद आव्हाड हे मोनो रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक नियमन करीत होते. तेव्हा त्यांना काळ्या काचा असलेली कार भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने दोघांनी या कारचा पाठलाग केला. पोलिसांना बघून कारचा वेग आणखी वाढला. अखेर पोलिसांनी ती अडवलीच. तेव्हा कारमधून दोन तरुण बाहेर पडले. लगबगीत त्यांनी एक पिशवी रस्त्याच्या कडेला फेकली. या पिशवीत देशी बनावटीचा कट्टा आढळला.
पोलिस शिपाई पवार आणि आव्हाड यांनी अधिकची कुमक मागवून दोघांना ताब्यात घेतले. या गडबडीत आरोपींचा तिसरा साथीदार संधी साधून पळून जाण्यात यशस्वी ठरला. आदिल खान आणि इम्रान खान अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना वडाळा टीटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक केली. या शस्त्राचा वापर ते कुठे, कसा करणार होते, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT