मुंबई

माशेलकर

CD

परिवर्तनीय विज्ञान हे बहुजन हिताय हवे
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सल्ला

मुंबई, ता. २२ : नवसंशोधक हे डॉ. घरडा यांच्या जीवन तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप आहेत. परिवर्तनीय विज्ञान हे केवळ मोजक्या लोकांसाठी नसून ते बहुजन हिताय असायला हवे, यावर आमचा विश्वास आहे, असे मत पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ‘केएचजी इनोव्हेशन फाउंडेशन’ने २०२५-२६ या वर्षासाठी चार महत्त्वाच्या आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप्सची निवड केली आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. या वेळी के. एच. घरडा फाउंडेशनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, की ‘कमी खर्चात, अधिक लोकांसाठी, अधिक उत्तम सुविधा’ हे सूत्र हे चारही संशोधक सार्थ ठरवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘अगत्स्या सॉफ्टवेअर’ या कंपनीचा समावेश असून, त्यांनी सुईचा वापर न करता रक्तातील साखर आणि रक्तदाब मोजणारे वेदनारहित उपकरण विकसित केले आहे. दुसरीकडे, ‘रेमेडिओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स’ने डोळ्यांच्या उपचारांसाठी ७० टक्के कमी खर्चात ग्लुकोमा निदानाचे तंत्रज्ञान आणले आहे. जे सामान्य दवाखान्यांसाठी वरदान ठरेल. ‘फास्ट सेन्स इनोव्हेशन्स’ने सेप्सिससारख्या जीवघेण्या आजाराचे निदान अवघ्या काही मिनिटांत करण्याची क्षमता विकसित केली आहे, तर ‘आयु डिव्हाइसेस’ने डिजिटल स्टेथोस्कोपच्या माध्यमातून हृदय आणि फुप्फुसांच्या आजारांचे अचूक निदान प्राथमिक आरोग्य केंद्रांतच शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमाद्वारे देशातील कोट्यवधी लोकांना स्वस्त, विनाशस्त्रक्रिया आणि जीवनरक्षक आरोग्य सुविधा मिळतील. केवळ शहरांपुरती मर्यादित असलेली उच्च दर्जाची आरोग्य सेवा आता ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. प्राध्यापक अनिल गुप्ता यांनी नमूद केले, की भारताच्या आरोग्य व्यवस्थेला उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान अशा शास्त्रज्ञांकडून येत आहे. यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करता खर्च कमी होतो. या स्टार्टअप्सना केएचजी फाउंडेशनतर्फे तांत्रिक मार्गदर्शन, भांडवल आणि बाजारपेठेसाठी आवश्यक नेटवर्क पुरवले जाणार आहे. गेल्या वर्षीच्या दोन स्टार्टअप्ससह आता एकूण सहा प्रकल्प एकत्रितपणे भारतातील असंसर्गजन्य रोगांशी लढा देण्यासाठी सज्ज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT