मानखुर्दमध्ये भंगार बाजारात आग
तरुण जखमी; पाच-सहा सिलिंडरचा स्फोट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मानखुर्द येथील मंडाला परिसरातील एकतानगर येथील भंगार बाजारात शुक्रवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या आगीत पाच ते सहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. शाहरुख खान (वय २५) असे जखमीचे नाव असून तो ४० ते ४५ टक्के भाजला आहे.
मंडाला येथील कुर्ला स्क्रॅप डीलर्सच्या पाच ते सहा गाळ्यांना पहाटे आग लागली. आगीची भीषणता पाहून अग्निशमन दलाने ५.१४ वाजता ‘लेव्हल-१’ जाहीर केली. या गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार, इलेक्ट्रिक वायरिंग, ताडपत्रीचा साठा, प्लायवूड आणि ५० ते ६० तेलाचे ड्रम असल्याने आगीने वेगाने प्रसार केला. विशेषतः पाच ते सहा एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.
या आगीत शाहरुख खान हा तरुण गंभीररीत्या होरपळला असून त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ४० ते ४५ टक्के भाजला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ८.४० वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या मोहिमेत अग्निशमन दलासह पोलिस, १०८ रुग्णवाहिका, पालिकेचे वॉर्ड कर्मचारी आणि विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते. सुमारे ५०० बाय ५०० फूट परिसरात ही आग पसरली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.