मुंबई

श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी ५९ लाखांचा आमदार निधी

CD

ग्रामस्थांकडून आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : आग्रोळी गावातील श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, याबद्दल गावातील नागरिकांनी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
काही दिवसांपूर्वी आग्रोळी गावातील संकटमोचन हनुमान मंदिराच्या सभा मंडपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ग्रामस्थांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे श्री अमृतेश्वर मंदिर परिसरातही अशाच प्रकारचा सुसज्ज सभामंडप उभारण्याची मागणी केली होती. गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामस्थांना एकत्र येण्यासाठी प्रशस्त जागा मिळावी, अशी भावना यामागे होती.
या मागणीची तातडीने दखल घेत आमदार मंदा म्हात्रे यांनी श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आग्रोळी गावातील श्री अमृतेश्वर मंदिर हे ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाते. वर्षभर विविध धार्मिक विधी, उत्सव, भजन, कीर्तन तसेच सामाजिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. मात्र, मंदिर परिसरात पुरेशा सुविधा नसल्याने विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सभामंडप उभारल्यानंतर शिवभक्तांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळणार असून, कार्यक्रम अधिक सुव्यवस्थितपणे पार पाडता येणार आहेत.
या वेळी दिलीप वैद्य, राजेश पाटील, श्याम पाटील, गजानन पाटील, सुधीर पाटील, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदारांच्या तत्परतेचे कौतुक करत भविष्यातही गावाच्या विकासासाठी असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E22, E25, E27 पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या कार-बाईकवर काय परिणाम होणार? मायलेज, इंजिन आणि किंमतीबाबत जाणून घ्या

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

Auspicious June 2026: यंदाचा जून महिना धार्मिकदृष्ट्या विशेष; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : जसपाल राणा यांचे निधन ही क्रीडा विश्वासाठी मोठी हानी: पंतप्रधान मोदी

Mumbai Traffic : मुंबईत प्रवास करताय? LBS मार्गावर 'या' तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद; घरून निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT