मुंबई

आज मध्य रेल्वेवर १५ तासांचा मेगा ब्लॉक;कसारा मार्गावर लोकल ठप्प, प्रवाशांचे होणार हाल

CD

मध्य रेल्वेवर आज १५ तासांचा मेगाब्लॉक
कसारा मार्गावर परिणाम; आसनगाव-कसारादरम्यान सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मध्य रेल्वेच्या कळवा-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी खर्डी यार्डमध्ये नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी शनिवारी (ता. २५) दुपारी १२ ते रविवारी (ता. २६) पहाटे ३ वाजेपर्यंत उंबरमाळी-आटगावदरम्यान १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव ते कसारादरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल सकाळी ८.३३ वा. सुटेल, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे शेवटची लोकल सकाळी १०.१८ वा. धावेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी पहाटे ४.१९ वा., तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहाटे ३.५१ वा. सुरू होईल. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. ब्लॉकदरम्यान कसारा मार्गावरील बहुतांश लोकल गाड्या आसनगाव, टिटवाळा किंवा वासिंद येथेच अर्ध्यावर थांबविण्यात येणार आहेत. तसेच तेथूनच सुरू होतील. शनिवार सीएसएमटीहून सकाळी ९.३४ ते रात्री ९.३२ दरम्यान सुटणाऱ्या सीएसएमटी-कसारा लोकल गाड्या आसनगाव येथेच थांबतील. दुपारी १.३० वा. सुटणारी सीएसएमटी-आसनगाव, तसेच सायंकाळी ६.२८ वा. आणि मध्यरात्री १२.०८ वा. सुटणाऱ्या सीएसएमटी-कसारा लोकल गाड्या टिटवाळा येथे अर्ध्यावर थांबतील. रात्री १०.४७ वा. सुटणारी लोकल वासिंद येथे थांबविण्यात येणार आहे.

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवेलाही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्या आसनगाव किंवा टिटवाळा येथूनच सुरू होतील. तसेच शनिवारी दुपारी २.४२ वा. सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक पायाभूत सुविधा उभारणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
- ब्लॉक कुठे आणि केव्हा?
- उंबरमाळी ते आटगावदरम्यान ब्लॉक
- शनिवार (ता. २५) दुपारी १२.०० वा.पासून
- रविवार (ता. २६) पहाटे ३.०० वा.पर्यंत
- एकूण कालावधी : १५ तास
- काम : खर्डी यार्ड रिमॉडेलिंग व तिसऱ्या मार्गाचे नॉन-इंटरलॉकिंग काम
- आसनगाव-कसारादरम्यान लोकल पूर्णपणे बंद
....

शेवटची लोकल
- सकाळी ८.३३ वा. शेवटची सीएसएमटी-कसारा लोकल

- सकाळी १०.१८ वा. शेवटची कसारा-सीएसएमटी लोकल
....
पहिली लोकल

- पहाटे ४.१९ वा. पहिली सीएसएमटी-कसारा लोकल

- पहाटे ३.५१ वा. पहिली कसारा-सीएसएमटी लोकल

.....

अशा धावतील लोकल

१. आसनगाव-कसारादरम्यान
सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद

२. सीएसएमटी-कसारा लोकल
सकाळी ९.३४ वा. ते रात्री ९.३२ वा.
आसनगावपर्यंतच धावतील.

३. सीएसएमटी-कसारा (सायंकाळी ६.२८ वा., रात्री १२.०८ वा.) टिटवाळा येथेच थांबतील.

४. कसारा-सीएसएमटी लोकल
सकाळी ११.४७ वा. ते रात्री १०.३६ वा.
आसनगाव येथूनच सुरू.

५. कसारा-सीएसएमटी (सायंकाळी ५.१४ वा., रात्री ९.१२ वा. टिटवाळा येथूनच सुरू


.....

मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

- सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेस रद्द
- नांदेड-सीएसएमटी एक्स्प्रेस मनमाड येथे अर्ध्यावर
- काही गाड्या जळगाव-नंदुरबार-वसई रोडमार्गे वळविण्यात येणार
- काही गाड्या पुणे-लोणावळामार्गे वळविण्यात येणार
- २५ ते ३० मिनिटे विलंबाची शक्यता
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT