मुंबई

अलिबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह

CD

अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः अलिबाग शहरातील समुद्रकिनारी बुधवारी (ता. २२) सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीवरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अलिबाग समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक महिला बेशुद्धावस्थेत असल्याचे जीवरक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबात तातडीने अलिबाग पोलिस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत असल्याचे घोषित केले. या महिलेच्या पर्सची पाहणी केली असता, ओळखीचा कोणताही पुरावा सापडला नाही. एक चिठ्ठी आढळून आली असून, यावर पी. जी. पाटील अशी सही असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT