मुंबई

‘व्यावसायिक’च्या अंतिम स्पर्धेसाठी दहा नाटकांची निवड

CD

‘व्यावसायिक’च्या अंतिम स्पर्धेसाठी दहा नाटकांची निवड
मुंबई, ता. २५ : ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही माहिती दिली. या स्पर्धेत २७ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले होते. त्यातून ‘सविता दामोदर परांजपे’ (त्रिकुट व मॅनमेकर्स मीडिया), ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ (जिगिषा क्रिएशन्स), ‘कुटुंब किर्रतन’ (गौरी थिएटर्स), ‘संगीत बोलविता धनी’ (कल्पकला एण्टरप्रायझेस), ‘शंकर जयकिशन’ (भरत जाधव एंटरटेनमेंट), ‘भूमिका’ (जिगिषा व अष्टविनायक), ‘करुणाष्टके’ (भद्रकाली प्रॉडक्शन्स), ‘ठरलंय फॉरएव्हर’ (वाईडविंग्ज मीडिया), ‘मी vs मी’ (कल्पकला एण्टरप्रायझेस), ‘एकदा पाहवं करून’ (अस्मय थिएटर्स). या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नारायण जाधव, श्रीनिवास नार्वेकर आणि शिल्पा नवलकर यांनी काम पाहिले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञ यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. अंतिम फेरी लवकरच मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT