मुंबई

सर्वाधिक अपघाती १६० रस्ते होणार सुरक्षित

CD

सर्वाधिक १६० अपघाती रस्ते होणार सुरक्षित
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘परिवहन’ची नजर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यात सर्वाधिक अपघात घडणाऱ्या १६० रस्त्यांवर परिवहन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या रस्त्यांवर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसोबत रडारमार्फत वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जात आहे.
राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे अपघात व मृतांच्या संख्येत लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये सात टक्क्यांची, तर अपघाती मृत्यूंमध्ये आठ टक्क्यांची घट झाली. वाहतूक नियमभंगांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून, विशेषतः हेल्मेट व सीट बेल्ट वापर अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर सर्वाधिक १.८ लाखांहून अधिक कारवाया; याशिवाय वेगमर्यादा उल्लंघन, सीट बेल्टचा वापर न करणे, अवैध पीयूसी व विमा यांसारख्या नियमभंगांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
----
विविध उपाययोजनांवर भर
परिवहन विभागाने राज्यभरात रडार, इंटरसेप्टर वाहने आणि एआयआधारित यंत्रणा वापरून नियमभंगावर नियंत्रण आणले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात रस्ता सुरक्षा कृती आराखडे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ब्लॅक स्पॉट दुरुस्ती, वाहन तपासणी केंद्रांची उभारणी तसेच चालक प्रशिक्षणावरही विशेष भर देण्यात येत आहे.
---
दुचाकीस्वार व पादचारी बचाव अभियान
जनजागृती मोहिमांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत सजगता वाढली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपत्कालीन प्रतिसाद वेळ कमी करण्यासाठीही दुचाकीस्वार व पादचारी बचाव अभियानात उपाययोजना करण्यात आल्या. राज्य सरकारने २०३०पर्यंत अपघातांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
==
प्रत्येक जिल्ह्यातील अपघाताची कारणे व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हानिहाय रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- भरत कळसकर, सहपरिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT