मुंबई

सलीम डोलाला इस्तंबूलमध्ये अटक

CD

सलीम डोलाला इस्तंबूलमध्ये अटक
भारतातील ड्रग्ज तस्करांच्या साखळीला धक्का
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर सलीम डोला यास शनिवारी तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय यंत्रणा विशेषतः मुंबई गुन्हे शाखा अरब अमिरातीसह मध्यपूर्वेतील अन्य देशांकडे पाठपुरावा करत होती.
सलीमची अटक भारतातील मेफेड्रॉन अर्थात एमडी या रासायनिक अमली पदार्थाच्या उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीस जबर धक्का मानला जात आहे. त्याच्या अटकेमुळे मध्य पूर्वेतील देश आणि भारतातील अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांच्या संघटित साखळीची महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती पडू शकते. त्यासाठी गुन्हे शाखेने सलीमचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण व्हावे या उद्देशाने प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.
गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२४ मध्ये सांगलीतील कवठे महांंकाळ येथील एमडी उत्पादनाचा अवैध कारखाना उद्ध्वस्त करीत संबंधित आरोपींची धरपकड केली होती. या गुन्ह्यात एकूण २५२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते. या गुन्ह्याच्या तपासात सलीम डोला टोळीचे नाव पुढे आले. या टोळीने मध्यपूर्वेतील देशांत बसून या कारखान्यासाठी अर्थसहाय्य, मनुष्यबळाचा पुवठा केला. तसेच अमली पदार्थांच्या विक्रीसाठी भारतात संघटित साखळी उभी केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. याव्यतिरिक्त अमली पदार्थ तस्करीशी संबंधित गुन्हेही सलीमविरोधात नोंद आहेत.
----
मुलगा, साथीदारास गतवर्षी अटक
गुन्हे शाखेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षी सलीमचा मुलगा ताहीर आणि विश्वासू साथीदार सामील सोहेल शेख यांना दुबईत अटक झाली. तेथील सरकारने दोघांना भारतात प्रत्यार्पित केले. या दोघांचीही सलीमप्रमाणे सांगली प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. या दोघांच्या अटकेमुळे सलीम बिथरला आणि त्याने दुबई सोडून अन्य देशांमध्ये आसरा शोधला.
----
कोण होता सलीम?
आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांशी समन्वय साधून देशात अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, परदेशातील तस्करी करणारा सलीम १० वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील अनेक किरकोळ अमली पदार्थ विक्रेत्यांपैकी एक होता. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने येथील काही व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचेही सांगितले जाते. २०१६ या सुमारास दुबईत पसार झाल्यानंतर त्याने तेथून भारतात अमली पदार्थांची पाळेमुळे रुजवल्याचा आरोप आहे.
----
दाऊदसंबंधीही तपास
परदेशातील वास्तव्यात त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संधान झाले का? दाऊद टोळीनेच त्याला हेतुपुरस्सर मध्यपूर्वेत स्थायिक केले का? या दृष्टिकोनातून तपास केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT