मुंबई

सोमैया रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सुविधा

CD

सोमय्या रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सुविधा
कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर उपक्रमातून उभारणी
मुंबई, ता. २७ ः के. जे. सोमय्या रुग्णालय आणि संशोधन केंद्राने आपल्या निदान सुविधांना बळकटी देत अल्प उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी दर्जेदार तपासण्या सुलभ केल्या आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर उपक्रमातून रुग्णालयात १.५ टेस्ला क्षमतेची एमआरआय मशीन बसवण्यात आली असून, बालरुग्णांसाठीच्या एनआयसीयूसाठी व्हेंटिलेटरचीही भर घालण्यात आली आहे.
या नवीन एमआरआय युनिटचे उद्‌घाटन कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक गुप्ता यांच्या हस्ते आणि रुग्णालयाचे अध्यक्ष समीर सोमय्या आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एमआरआय सुविधा रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना बाह्य सेवांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी होणार असून रुग्णांचा खर्च घटेल आणि उपचार प्रक्रियेत विश्वासार्हता वाढेल. विशेषतः ज्या रुग्णांसाठी विलंब गंभीर ठरू शकतो, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरेल.
कोटक महिंद्रा बँकेचे सीएसआर व ईएसजी प्रमुख हिमांशू निवसारकर म्हणाले, की प्रगत निदान सुविधा हा विशेषाधिकार नसावा. आमच्या पाठबळामुळे विशेषतः मर्यादित पर्याय असलेल्या रुग्णांसाठी दर्जेदार इमेजिंग सेवा अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा बोबडे म्हणाल्या, की उपचार प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर निदान प्रणालींचा प्रभाव पडतो. या एमआरआयच्या समावेशामुळे विभागांमध्ये अधिक अचूकता येईल आणि वैद्यकीय निर्णय घेण्याची गुणवत्ता सुधारेल.

सर्व घटकांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा
रुग्णालयाचे अध्यक्ष समीर सोमय्या यांनी सांगितले, की अचूक आणि वेळेवर निदान होणे आजच्या आरोग्य व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने ही क्षमता बळकट झाली असून, समाजातील सर्व घटकांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आमचा नेहमीच ध्यास राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT