मुंबई

बुलेट ट्रेनसाठी अत्याधुनिक पूल उभारणी

CD

बुलेट ट्रेनसाठी अत्याधुनिक पूल उभारणी
१२ मजली इमारतीएवढी उंची; साबरमती नदीपात्रातील बांधकाम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अहमदाबाद येथील साबरमती नदीवर उभारला जाणारा पूल जलद गतीने आकार घेत आहे. सुमारे ३६ मीटर (११८ फूट) उंचीचा, १२ मजली इमारतीएवढा हा पूल ४८० मीटर लांबीचा असून, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मुख्य मार्गाच्या समांतर उभारला जात आहे.
हा पूल साबरमती बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे एक किमी, तर अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. पुलाचे आठही गोलाकार पाय पूर्ण झाले असून, त्यांचा व्यास ६ ते ६.५ मीटर आहे. यापैकी चार पाय नदीपात्रात, दोन किनाऱ्यावर आणि दोन नदीबाहेरील भागात उभारण्यात आले आहेत. पायांची उंची ३१ ते ३४ मीटरदरम्यान आहे. नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊ नये यासाठी पायांची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. हा पूल ७६ मीटरचे पाच स्पॅन आणि ५० मीटरचे दोन स्पॅन अशा एकूण सात स्पॅनचा असून प्रत्येक स्पॅन २३ सेगमेंट्स वापरून ‘इन-सिटू’ पद्धतीने उभारला जात आहे.

कॅन्टिलीव्हर तंत्राचा प्रभावी वापर
पुलाच्या बांधकामासाठी ‘बॅलन्स्ड कॅन्टिलीव्हर’ तंत्राचा वापर केला जात असून, या तंत्रामुळे नदीत स्कॅफोल्डिंग उभारण्याची गरज भासत नाही. प्रत्येक पियरपासून दोन्ही बाजूंनी संतुलित पद्धतीने भाग जोडून पोस्ट-टेंशनिंगद्वारे मजबूत आणि सलग ब्रिज डेक तयार केला जातो. आतापर्यंत पायाभूत व सबस्ट्रक्चरशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाली असून, ७६ मीटरचे तीन स्पॅनही पूर्ण झाले आहेत. सध्या पियर हेड बांधकाम आणि सेगमेंट कास्टिंगसह सुपरस्टक्चरचे काम सुरू आहे.

नदी प्रवाह अबाधित ठेवण्यावर भर
बांधकामादरम्यान नदीचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहावा, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या तटबंदीमध्ये ह्यूम पाइप कल्व्हर्ट्स बसवण्यात आले असून, नैसर्गिक जलनिकासी मार्ग कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काम सुरू असतानाही साबरमती नदीचा प्रवाह सुरळीत आणि अखंडित राहतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादळ! उमेदवारीवरून खदखद वाढली; पक्षातच बंडाची चिन्हं

Video Viral : वैभव सूर्यवंशीने 'सेल्फी'साठी लहान मुलांकडे मागितले प्रत्येकी १०० रुपये; सोशल मीडियावर रंगलीय याची चर्चा...

Amazon चा मोठा प्लॅन! 100 शहरांमध्ये Quick Commerce विस्तार; 16,000 शेतकऱ्यांना जोडणार, ऑपरेशन्ससाठी 2,800 कोटींची गुंतवणूक जाहीर

Latest Marathi News Live Update : खरिपाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रांचा संप

भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT