मुंबई

म्हाडाची एफसीएफएसची अर्ध्याहुन अधिक घरे विक्रीविना

CD

म्हाडाची एफसीएफएसची अर्ध्याहून अधिक घरे विक्रीविना
अडीच महिन्यांत केवळ ५२ घरांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : म्हाडाने वारंवार लॉटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांची म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) योजनेतून विक्री करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात काढली होती. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून, गेल्या अडीच महिन्यांत केवळ ५२ घरांची विक्री झाली असून, अर्ध्याहून अधिक ६२ घरे अद्याप विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे त्याची विक्री कशी करावी, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहिला आहे.
दोन वेळा लॉटरीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ताडदेव, भायखळा, लोअर परळ, वडाळा, जुहू, कांदिवली, मालवणी येथील ११८ घरांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत समावेश आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याच्या प्रक्रियेला १७ फेब्रुवारीला, तर सदनिका निश्चितीला ४ मार्चला सुरुवात झाली होती. लाॅटरीशिवाय मुंबईत घराचे स्वप्न पहिल्यांदाच पूर्ण होणार असल्याने अर्जदारांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा होती, परंतु मोजक्याच घरांची विक्री झाली आहे. वडाळा ॲण्टाॅप हिल येथील सर्वच्या सर्व २७ घरे विकली गेली आहेत. याशिवाय चारकोप, कांदिवली, जुहूमधील घरांनाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, ताडदेवच्या क्रिसेंट टाॅवरमधील पाचपैकी केवळ एका घराची विक्री झाली आहे.
या योजनेमधील काही घरांच्या किमती बाजारभावापेक्षा अधिक असल्याने अर्जदारांनी पाठ फिरवली आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास या योजनेपाठोपाठ अवघ्या काही दिवसांतच मुंबई मंडळाची लाॅटरी जाहीर झाली. याचाही फटका या योजनेला बसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT