मुंबई

‘पीएच.डी.’साठी परदेशातून विद्यार्थ्यांचे २४६ अर्ज

CD

‘पीएच.डी.’साठी परदेशातून विद्यार्थ्यांचे २४६ अर्ज
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रतिसाद

मुंबई, ता. २७ : जागतिक पातळीवर उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाला परदेशातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठात नव्‍याने सुरू केलेल्या पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ४८ देशांतील २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. यामुळे मुंबई विद्यापीठाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे.

मुंबई विद्यापीठाने संशोधनाधिष्ठित शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने नव्याने पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांनी दाखवलेला हा प्रतिसाद मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि संशोधन क्षमतेवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जाते. अर्जांमध्ये व्यवसाय व्यवस्थापनासाठी सर्वाधिक २८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापोठापाठ शिक्षणशास्त्रसाठी २२, लेखाशास्त्र आणि व्यवस्थापनासाठी प्रत्येकी १४, संगीत १३, इंग्रजी साहित्य १२, माहिती तंत्रज्ञान ११, समाजकार्य ९, सांख्यिकी आणि तत्त्वज्ञानासाठी प्रत्येकी आठ यासह समाजशास्त्र, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय संबंध, संगणकशास्त्र, मानसशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान, पुरातत्त्वशास्त्र, ग्रामीण विकास, नाट्यशास्त्र, उर्दू, राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, शारीरिक शिक्षण, इतिहास, भूगोल, लोककला, वाणिज्य, जैवतंत्रज्ञान, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, हिंदी, भौतिकशास्त्र आणि जैवभौतिकशास्त्र अशा विविध विषयांत संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांनुसार किमान गुण किंवा समतुल्य श्रेणी तसेच प्रवेश/रिसर्च ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असून, अंतिम निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे होईल.
------
मुंबई विद्यापीठ ‘ग्लोबल रिसर्च डेस्टिनेशन’ बनविण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलत असून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करणे हा या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधनातील सहकार्य आणि बहुसांस्कृतिक शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मोठी चालना मिळणार आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
----
या देशांतील विद्यार्थी
मलावी, जिबूती, लेसोथो, रशिया, बांगलादेश, श्रीलंका, अँगोला, सुदान, बोत्सवाना, इथिओपिया, इजिप्त, नेपाळ, येमेन, सोमालिया, युगांडा, इराक, टांझानिया, कोमोरोस, सीरिया, घाना, थायलंड, कंबोडिया, केनिया, म्यानमार, लायबेरिया, सिएरा लिओन, मादागास्कर, ताजिकिस्तान, माली, झांबिया, नायजेरिया, नामिबिया, मॉरिशस, पॅलेस्टाईन, इंडोनेशिया, फिजी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, मोझांबिक, नायजर, झिम्बाब्वे, कझाकस्तान येथील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे अर्ज सादर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सोमवारपासून कामगार संघटनेचे घंटानाद आंदोलन, २९ जूनपासून बेमुदत धरणे...

Simcard Safety : मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होतंय का? हॅक झालेलं असू शकतंय तुमचं सिमकार्ड, 'या' ट्रिकने लगेच करा चेक

Latest Marathi News Live Update : पक्ष काँग्रेसमध्ये विलनी करण्याऐवजी भाजपा सोबत या, रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव

Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

SCROLL FOR NEXT