आजपासून बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस सीईटी प्रवेश परीक्षा
मुंबई, ता. २७ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीची प्रवेश परीक्षा मंगळवारी २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही सीईटी २८ व २९ एप्रिल २०२६ या दोन दिवशी घेण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रावर ७१,०६७ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ७१,०६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये ३५५ अनाथ विद्यार्थी व ३२३ दिव्यांग विद्यार्थी ही सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
२०२५च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,४३६ व बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही सीईटी दोन वेळेस घेण्यात आली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. तसेच यापूर्वी बी.एचएमसीटी व बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. यावर्षीपासून दोन्ही अभ्यासक्रमाची एकच सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.