मुंबई

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

CD

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट
१५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा तळ गाठत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी (ता. २८) घेतलेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली आहे.

​महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले, की मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये सध्या केवळ २८.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा साधारणपणे ६ जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र ‘अल निनो’चा परिणाम आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे प्रशासनाने आतापासूनच सावधगिरी बाळगून पाऊल उचलले आहे. दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाणीसाठ्याची मागणी केली आहे. यामध्ये भातसा धरणात १२३ दशलक्ष घनमीटर राखीव साठा तसेच अप्पर वैतरणा धरणामधील ९० दशलक्ष घनमीटर राखीव साठा पाण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी मागणी महापालिकेकडून राज्य सरकारकडे दरवर्षी केली जाते व राज्य सरकारदेखील मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करीत असल्याचे सांगण्यात आले.

​‘अल निनो’चा प्रभाव
हवामान खात्याने यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास शहरात जलसंकट निर्माण होऊ नये, या उद्देशाने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने केवळ घोषणा न करता नि:क्षारीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी यानिमित्ताने केली आहे.

जर राज्य सरकारने राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी दिली तसेच १५ मेपासून १० टक्के कपात लागू केली तरच मुंबईला १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल.
- अश्विनी भिडे, ​आयुक्त, मुंबई महापालिका
.........
एकूण पाणीसाठा स्थिती (२८ एप्रिल २०२६)
वर्ष एकूण उपयुक्त साठा (दशलक्ष लिटर)/ टक्केवारी (टक्के)
२०२६ - ४,१०,३५७ (२८.३५)
२०२५ - ३,६५,८८३ (२५.२८)
२०२४ - २,८९,३९४ (१९.९९)
......
प्रमुख तलावनिहाय उपयुक्त पाणीसाठा (२८ एप्रिल २०२६)
तलाव उपयुक्त साठा (दशलक्ष लिटर) साठा टक्केवारी
अप्पर वैतरणा ५३,४६९ (२३.५६)
मोडक सागर-४४,७२५ (३४.७७)
तानसा -३३,८४६ (२३.३३)
मध्य वैतरणा- ६३,३६४ (३२.७३)
भातसा -१,९७,३२१ (२७.५२)
विहार -१४,६६३ (५२.६८)
तुळशी -२,९६९ (३६.८६)
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT