मुंबई

मराठीसाठी ‘परिवहन’ची विशेष मोहीम

CD

मराठीसाठी ‘परिवहन’ची विशेष मोहीम
अमराठी चालकांना देणार मराठीचे धडे : मंत्री प्रताप सरनाईक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या बैठकीत सर्वांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे, ही भूमिका सर्वांनी मान्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व ५९ परिवहन विभागांना (आरटीओ) १ मेपासून विशेष तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन व बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे; मात्र केवळ मराठी येत नाही म्हणून परवाना रद्द केला जाणार नसून, इतर कायदेशीर तरतुदींनुसारच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मिरा-भाईंदर येथील मोहिमेत ३,४४३ रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५६५ चालकांना मराठीचे ज्ञान सिद्ध करता आले नाही; मात्र त्यांनी भाषा शिकण्याची तयारी दर्शविल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

मराठी शिक्षण सुविधा
इच्छुक चालकांसाठी आरटीओ कार्यालयांमध्ये मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ व ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ यांच्या सहकार्याने प्रशिक्षण, तसेच पुस्तिका व ई-पुस्तिका दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, परवाना नूतनीकरणासाठी ते आवश्यक राहील, असेही परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

कारवाईचा इशारा
मराठी शिकण्याची संधी देऊ; पण नियमभंग सहन केला जाणार नाही, असा इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला. १०० दिवसांच्या मोहिमेनंतर १६ ऑगस्टला अहवाल सादर करून पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

SCROLL FOR NEXT