पाच कोटी दिले नाही तर स्फोट
लोहमार्ग पोलिसांना फोनवरून धमकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला मंगळवारी (ता. २८) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका धमकीच्या फोनमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘इरफान’ असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची खंडणी मागत सरकारशी थेट संपर्क साधून देण्याचीही मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे सेवा, सैन्यतळ आणि महत्त्वाच्या हॉटेल्समध्ये स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी रेल्वे नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून आल्याची माहिती मिळाली आहे.
संबंधित कॉल ज्या क्रमांकावरून करण्यात आला, तो पाकिस्तानातील असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके, तसेच संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त वाढवण्यात आला. रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त तपासणी मोहीम हाती घेतली. विविध ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली; मात्र कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास यंत्रणा काम करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेल्वे स्थानकावर सुरक्षा कडेकोट
धमकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉग स्क्वॉडच्या पथकांनी प्रमुख रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी मोहीम राबवली. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.