‘वंदे भारत’ अपघाताची उच्चस्तरीय चौकशी
पाच विभागांचे अधिकारी करणार तपास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पुणे स्थानकात सोमवारी सायंकाळी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा एका डबा रुळावरून घसरल्याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीत सुरक्षा, ट्रॅक, यांत्रिक विभागांसह विद्युत व सिग्नल-टेलिकॉम तज्ज्ञांचा समावेश आहे. घटनेचा सखोल तपास करून कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.
पुणे स्थानकात प्रवेश करताना डायमंड क्रॉसिंगजवळ वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतील ६९९ प्रवाशांना बाहेर काढून त्यांची डेक्कन क्वीनद्वारे पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेमुळे डेक्कन क्वीनच्या मंगळवारच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. दरम्यान, चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सुरक्षा, ट्रॅक, यांत्रिक, विद्युत तसेच सिग्नल-टेलिकॉम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तांत्रिक बिघाड, देखभाल प्रक्रिया आणि ट्रॅक रचनेची स्थिती यांचा सखोल तपास केला जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, डायमंड क्रॉसिंगमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी दुरुस्तीचे काम काही तासांत पूर्ण करण्यात आले असून, रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली आहे.
----
चौकशी समिती काय तपासणार?
- डायमंड क्रॉसिंगमध्ये तांत्रिक बिघाड होता का?
- ट्रॅकची तपासणी, देखभाल वेळेत झाली होती का?
- सिग्नल-टेलिकॉम प्रणालीत काही त्रुटी होत्या का?
- मानवी चूक किंवा कार्यपद्धतीत त्रुटी होती का?
- नॉन-स्टँडर्ड क्रॉसिंगमुळे धोका वाढला का?
- भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाय काय?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.