मुंबई

राज्यात उष्माघाताचे ५५ रुग्ण

CD

राज्यात उष्माघाताचे ५५ रुग्ण
दररोज सरासरी एक जण बाधित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः राज्यात उष्माघाताच्या (हीट स्ट्रोक) घटनांमध्ये वाढ होत असून आतापर्यंत एकूण ५५ रुग्णांची नोंद झाली आहे. मार्चपासून २६ एप्रिलपर्यंत दररोज सरासरी एक व्यक्ती उष्माघाताचा बळी ठरत आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पाच जण बाधित झाले असून पालघरमध्ये दोन, रायगडमध्ये दोन आणि ठाण्यात एक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

यंदा राज्यात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मार्चमध्ये मुंबईसह अनेक भागांत उष्णतेची लाट होती. एप्रिलमध्ये मुंबईत उष्णतेची लाट नसली तरी राज्यातील इतर भागांत उकाडा कायम आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नंदुरबारमध्ये सर्वाधिक १४ रुग्ण नोंदले गेले आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये सात, गडचिरोलीत पाच आणि रत्नागिरीत चार रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मार्चअखेरपर्यंत फक्त पाच रुग्ण होते; मात्र एप्रिलच्या २६ दिवसांतच ५० जण उष्माघाताने बाधित झाले आहेत. उष्माघातामुळे आतापर्यंत दोन संशयित मृत्यूंची नोंद झाली असून अहिल्यानगर आणि सोलापूर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी शक्यतो उन्हात जाणे टाळावे. बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करावा, सैल कपडे घालावेत आणि शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून वेळोवेळी द्रवपदार्थ घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दीर्घकाळ उन्हात राहिल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. शरीराचे तापमान अत्याधिक वाढते, शरीरातील पाणी कमी होते आणि अवयवांवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो. डोकेदुखी, चक्कर येणे, झटके येणे, विचारशक्ती कमी होणे, ही त्याची लक्षणे आहेत.
- डॉ. मधुकर गायकवाड, प्रमुख, औषध विभाग, जेजे रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT