मुंबई

‘आम्हीही माणसे आहोत, आम्हाला माणूस म्हणून जगू द्या’

CD

‘आम्हीही माणसे आहोत, आम्हाला माणूस म्हणून जगू द्या’
पारधीबांधवांचा मुंबईत टाहो
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, तरीही आम्हाला आजही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. नाले आणि गटारे साफ करताना आमची आठवण येते, पण आमचे राहणे समाजाला घाण वाटते. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या, अशा शब्दांत पारधी समाजातील कष्टकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला.
महाराष्‍ट्र दिन १ मे आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून मुंबईतील भटके विमुक्त श्रमिकांच्या वतीने एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुंबईभरातील उघड्यावर राहणाऱ्या सुमारे २०० हून अधिक महिला व पुरुष कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या.
​बीड, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमधून पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज मुंबईत येतो. बोरिवलीतील चिकूवाडी येथे राहणाऱ्या ६० पारधी कुटुंबांच्या झोपड्यांवर नुकतीच २०० पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. सरकार एकीकडे उष्माघातापासून संरक्षणाचे आवाहन करत असताना, दुसरीकडे भरउन्हात श्रमिकांचे निवारे तोडले जात असल्याचा निषेध या मेळाव्यात करण्यात आला.
​​मेळाव्यात बोलताना चिकूवाडी येथील गीता काळे यांनी प्रशासनाला सवाल केला की, ड्रग्ज शोधण्याच्या नावाखाली आमच्यावर कारवाई होते. जर आम्ही अवैध धंदे केले असते, तर नालेसफाईची घाणेरडी कामे कशाला केली असती, नाले तुंबले की आमची आठवण येते, मग आमचे अस्तित्व तुम्हाला का नकोसे वाटते, असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्‍थित केला. आंबेडकरवादी पारधी समाजाचे नेते रामू काळे यांनी आरोप केला की, प्रशासन आणि समाजव्यवस्था कधी घाणीचा वास, तर कधी चोरीचा संशय घेऊन या समाजाला शहराबाहेर हाकलण्याचे षड्‌यंत्र रचत आहे. गंगा पवार, सुनिता गाडे, लक्ष्मण काळे यांनीही पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला.
​ ​पाणी हक्क समितीचे योगेश बोले यांनी घोषणा केली की, मुंबईतील उघड्यावर राहणाऱ्या पारधी बांधवांवर पोलिस आणि महापालिकेकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात लवकरच एका महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. ​या मेळाव्याला कांदिवली (दत्तानी पार्क), बोरिवली (डॉन बॉस्को, एमटीएनएल परिसर), विलेपार्ले आणि गोरेगाव परिसरातील कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पाणी हक्क समिती, घर हक्क संघर्ष समिती, सम्यक संस्था, संभाजी ब्रिगेड आणि स्वयं दीप संस्थांच्या प्रतिनिधींनी या संघर्षाला आपला पाठिंबा दर्शवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT