मुंबई

मानसशास्त्र विभागातील प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

CD

मानसशास्त्र विभागातील
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रम उपलब्ध
मुंबई, ता. ४ ः मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एमए मानसशास्त्र (दोन वर्षे), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजी (एक वर्ष), बीए ऑनर्स आणि बीए ऑनर्स विथ रिसर्च (चार वर्षे) आणि पीएचडी असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय एमए अभ्यासक्रमांतर्गत क्लिनिकल मानसशास्त्र, कौन्सलिंग मानसशास्त्र, इंडस्ट्रीयल-ऑर्गनायझेशनल मानसशास्त्र आणि सामाजिक व समुदाय मानसशास्त्र असे चार प्रमुख विशेष पर्याय उपलब्ध आहेत.
मानसशास्त्र विभागात स्मार्ट क्लासरूम्स, प्रायोगिक मानसशास्त्र प्रयोगशाळा, मानसशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळा आणि अ‍ॅक्टिव्हिटी स्पेस अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. व्यक्तिमत्त्व, भाषा व संस्कृती, हवामान बदल व शाश्वतता, सैद्धांतिक मानसशास्त्र आणि चिंता व मानवी स्थिती या विषयांवर प्रयोगशाळाही कार्यरत आहेत. याशिवाय मुंबई ऑनलाइन सायकोमेट्रिक सेंटर हा विशेष उपक्रम देशातील खुल्या, मोफत आणि बहुभाषिक ऑनलाइन सायकोमेट्रिक्स सेवा देणारा एकमेव केंद्र म्हणून ओळखला जातो. या माध्यमातून नागरिकांना मानसशास्त्रीय चाचण्या डिजिटल स्वरूपात घेता येत असून, त्यांचे अहवाल मोफत उपलब्ध करून दिले जातात.
----
इंटर्नशिपच्या विविध संधी
विभागात विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय मूल्यांकन, निदान, समुपदेशन व मानसोपचाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता व मानसशास्त्राचा समन्वय, कोडिंग, एक्सपेरिमेंटल डिझाईन आणि मानसशास्त्रीय चाचण्याही घेतल्या जातात. विविध इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळवून दिला जातो.
----
प्रवेश पात्रता काय?
या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी पदवीच्या अंतिम वर्षात मानसशास्त्र हा विषय असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेचे तपशील, पात्रता निकष आणि अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT