मुंबई

केवळ २२ दिवसांत बसवले पाच गर्डर

CD

केवळ २२ दिवसांत बसवले पाच गर्डर
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अहमदाबादमधील मणिनगर येथे अवघ्या २२ दिवसांत पाच प्रीकास्ट गर्डर यशस्वीरीत्या बसवण्यात आले. सक्रिय रेल्वे मार्गावर अत्यंत अचूकता, वेग आणि समन्वय साधत ही महत्त्वाची अभियांत्रिकी कामगिरी पूर्ण करण्यात आली.
ही गर्डर लाँचिंग प्रक्रिया ८, १३, १९, २४ आणि २९ एप्रिल २०२६ला टप्प्याटप्प्याने पार पडली. यामधील सर्वात जड गर्डर सुमारे १,३६० मेट्रिक टन वजनाचा असून, ८ एप्रिलला त्याचे लाँचिंग करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या कार्यरत मार्गावर उचलण्यात आलेल्या सर्वांत जड संरचनांपैकी ही एक मानली जाते. पाचही गर्डरचे वजन १,१७० ते १,३६० मेट्रिक टनदरम्यान आहे. दोन पीयर्समधील अंतर सुमारे ३० ते ३४ मीटर असल्याने भार सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी मजबूत पोर्टल गर्डर प्रणालीची गरज होती.
-----
क्रॉलर क्रेनचा वापर
या कामासाठी २,२०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेनचा वापर करण्यात आला. ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (ओएचई ), मर्यादित जागा आणि सुरू असलेली रेल्वे वाहतूक लक्षात घेता हे काम पार पाडण्यात आले.
--------
पोर्टल गर्डरची वैशिष्ट्ये
हे पोर्टल गर्डर ३४ मीटर लांबीचे असून, त्यांचा क्रॉस-सेक्शन ५.५ मीटर बाय ४.५ मीटर आहे. हे गर्डर साइटवरच प्रीकास्ट करून एकसंध संरचनेच्या स्वरूपात उभारण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT