मुंबई

वडाळ्यात भीषण आग

CD

वडाळ्यात भीषण आग
वृद्ध जखमी; दोन व्यावसायिक गाळे खाक
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : वडाळा (पूर्व) येथील संगमनगर भागात सोमवारी पहाटे एका व्यावसायिक गाळ्याला भीषण आग लागली. या आगीत ६५ वर्षीय एक वृद्ध व्यक्ती भाजला.
वडाळ्याच्या सॉल्ट पॅन रोडवरील एका इमारतीतील गाळ्याला पहाटे १.३४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग तळमजल्यावरील हेअर कटिंग सलून आणि त्याच्या मागील बाजूस असलेल्या गारमेंट कंपनीत पसरली होती.
​या आगीत सलूनमधील उपकरणे, खुर्च्या आणि गारमेंट कंपनीतील शिवणयंत्रे, कच्चा माल, कपड्यांचे रोल तसेच महत्त्वाचे दस्तऐवज खाक झाले. ​या दुर्घटनेत मोहम्मद उमर (६५) हे किरकोळ भाजले असून, त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT