मुंबई

आरेतील ६५ एकर जागेवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

CD

आरेतील ६५ एकर जागेवर
वृक्षलागवडीचे नियोजन करा
पालकमंत्री आशीष शेलार यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : आरे वसाहतीमधील विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीतील सुमारे ६५ एकर मोकळ्या जागेवर येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करा. आरे जंगलाची घनता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, शेलार यांनी आज आरे वसाहतीची पाहणी केली. मुंबईचे वाढते तापमान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपनगरातील हरित क्षेत्र वाढवण्यावर त्यांनी भर दिला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महापालिका आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेलार यांनी गोरेगाव पशुवैद्यकीय रुग्णालय, महानंद डेअरी मुख्यालय, राज्य राखीव पोलिस बल, फोर्स वन कार्यालय, कृषी उद्योग विकास महामंडळ आणि मॉडर्न बेकरी कॅम्पस या भागांची पाहणी केली. या कार्यालयांच्या परिसरात सुमारे ६५ एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध होऊ शकते. या जागांवर स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यासोबतच, जिथे शक्य आहे तिथे ‘मियावाकी’ पद्धतीने घनदाट जंगले विकसित करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
​----
​मुंबईच्या फुप्फुसाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर जंगलाची घनता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे.
- ॲड. आशीष शेलार, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT