मुंबई

स्वयंचलित लोकलची उत्तरेत चाचणी

CD

बंद दरवाजाच्या लोकलची उत्तरेत चाचणी
मुंबईतील गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : देशातील पहिल्या स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी विभागांतर्गत खजुराहो-महोबा या ६३.२७ किमी मार्गावर या अत्याधुनिक रेकची सखोल चाचणी सुरू आहे. छतरपूर जिल्ह्यालगतचा हा मार्ग तुलनेने कमी वाहतुकीचा असल्याने या ठिकाणी चाचणी घेण्यात येत आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे या स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकलचे रेक तयार करण्यात आले. यापैकी पहिला रेक काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाला. यानंतर दुसरा रेक मुंबईत न आणता थेट झाशी विभागात चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या दुसऱ्या रेकची प्रत्यक्ष चाचणी सुरू आहे. मुंबई उपनगरी मार्गावरील प्रचंड गर्दी, पिक अवर्समधील ताण आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ लक्षात घेता, दिवसा चाचणी घेणे जवळपास अशक्य होते. रात्रीच्या मर्यादित वेळेत सर्व प्रणालींची सर्वंकष चाचणी पूर्ण करणेही कठीण ठरत असल्याने रेल्वे प्रशासनाने दुसरा रेक चाचणीसाठी उत्तर भारतात हलवण्याचा निर्णय घेतला. या वेळी स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची अचूकता, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली, दरवाजे उघडणे-बंद होण्याचा वेळ आणि स्थानकांवरील थांब्यांचा कालावधी यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही, ही प्रणाली प्रत्यक्ष परिस्थितीत किती प्रभावी ठरते, हेही तपासले जात आहे.
---
हवा खेळती राहण्याची कसोटी
बंद दरवाजांच्या लोकलमध्ये हवा खेळती राहावी, हे सर्वात मोठे आव्हान मानले जाते. छतावरील ब्लोअर्सद्वारे ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’, लूव्हर डिझाइन दरवाजे आणि मोठ्या खिडक्यांमधून हवा खेळती राहते का, याची सखोल चाचणी सुरू आहे. गर्दीत प्रवाशांच्या चढ-उताराच्या सवयींमध्ये होणारे बदल, प्लॅटफॉर्मवरील हालचालींचा वेग आणि एकूण ऑपरेशनवर पडणारा ताण याचाही अभ्यास केला जाणार आहे.
----
मुंबईत अंतिम चाचण्या
मुसळधार पावसात पाणी डब्यांमध्ये शिरू नये, यासाठी अँटी-वॉटर इन्ग्रेस प्रणालीची चाचणी घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणून अंतिम चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रवासी सेवेसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT