‘अक्षयकल्प ऑरगॅनिक’ची दुग्धजन्य उत्पादने महाराष्ट्रात
मुंबई, ता. ६ : स्वच्छ, शुद्ध आणि रसायनविरहित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या ‘अक्षयकल्प ऑरगॅनिक’ची उत्पादने आता मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहेत.
‘अक्षयकल्प’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शशी कुमार यांनी नुकतीच येथे पत्रकारांना याबाबत माहिती दिली. कंपनीची दूध, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच प्रोटीनयुक्त पेये बाजारात आली असून त्यात कोणत्याही प्रकारचे अँटिबायोटिक्स, हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश, कृत्रिम रसायने, प्रिझर्वेटिव्ह नसतात, असा त्यांचा दावा आहे. या उत्पादनांसाठी आवश्यक असलेले दूध शुद्ध प्रक्रियेमार्फतच शेतकऱ्यांनी तयार करावे, असा कंपनीचा आग्रह असतो. त्यानुसार कंपनीतर्फे शेतकऱ्यांना आणि प्रशिक्षण आणि साह्यदेखील दिले जाते. या एकंदर प्रक्रियेत शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व्हावे आणि शुद्ध उत्पादनाबरोबरच मातीमधील कस कायम राहावा, दूध देणाऱ्या पशूंचे आरोग्य चांगले राहावे, यावरही भर दिला जातो. त्यानुसार विश्वासार्ह स्रोतांमधूनच दूध मिळवले जाते. कंपनीशी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या पशूंची दूध निर्मितीक्षमतादेखील दरवर्षी वाढत असल्याचे शशी कुमार म्हणाले. या आर्थिक वर्षात कंपनीने ६०० कोटी रुपये महसूल मिळवला असून महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी कंपनीने वितरण उत्पादन आणि पायाभूत सुविधा जाळे सक्षम करण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.