मुंबई

नायर मार्ड संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत अबनावे

CD

नायर मार्ड संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत अबनावे
२०२५-२६ वर्षासाठी नव्या समितीकडे जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : नायर मार्ड संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत अबनावे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सतर्फे निवृत्त अध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव यांनी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. यशवंत अबनावे यांच्याकडे जबाबदारी सोपवली.
नायर रुग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव हे अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर डॉ. यशवंत अबनावे यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अधिकृत समिती हस्तांतरण समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.
२०२५-२६ या वर्षासाठी कार्यकारिणीकडून नव्याने स्थापन समितीकडे अधिकृतरीत्या जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी निवासी डॉक्टर, सल्लागार, प्रशासन व समिती सदस्यांचे आभार व्यक्त केले.
नवीन समिती गठित करण्याची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व लोकशाही पद्धतीने राबविण्यात आली. खुल्या नामांकन प्रक्रियेद्वारे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले, त्यानंतर सर्व उमेदवारांना स्वतःची भूमिका व दृष्टिकोन मांडण्याची संधी देण्यात आली. सर्व निवासी डॉक्टरांच्या चर्चेनंतर आणि एकमताने नवीन समितीची निवड करण्यात आली.

अशा झाल्‍या नियुक्‍त्‍या
- अध्यक्ष - डॉ. यशवंत अबनावे
- सर्वसाधारण सचिव - डॉ. पूजा अग्रवाल
- उपाध्यक्ष - डॉ. अमन म्हस्के, डॉ. निखिल गोपाल
- खजिनदार - डॉ. बालमुरुगन, डॉ. शंकर जगताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT