मुंबई

‘कृत्रिम दागिन्यांच्या कारखान्यांमुळे आरोग्‍याला धोका’

CD

कृत्रिम दागिन्यांच्या कारखान्यांमुळे आरोग्‍याला धोका

मुंबई, ता. ७ : मुंबईतील दाटीवाटीच्या निवासी क्षेत्रांमध्ये आणि झोपडपट्टी भागांत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत कृत्रिम दागिन्यांच्या कारखान्यांमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणत्याही परवानग्या न घेता, केवळ काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे जीवघेणे उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगरसेवक अजित रावराणे यांनी केला आहे.
कृत्रिम दागिने बनवण्याच्या प्रक्रियेत अ‍ॅसिड आणि मानवी शरीराला घातक असलेल्या विविध रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नियमांची पायमल्ली करत हे कारखाने प्रदूषित पाणी थेट उघड्या गटारांमध्ये सोडत आहेत. त्‍यामुळे परिसरात वायू आणि जलप्रदूषणाची पातळी भयानक वाढली आहे. या विषयावर आगामी जून महिन्याच्या महासभेत प्रशासनाकडून सविस्तर उत्तर मागविण्यात येणार आहे, अशी माहिती अजित रावराणे यांनी दिली.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT