मुंबई

आभासी अटकेतील कुटुंब बेघर होण्यापासून वाचले

CD

आभासी अटकेतील कुटुंब बेघर होण्यापासून वाचले
४० लाख उकळल्यानंतर घर विकण्याची भामट्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः सायबर भामट्यांनी आभासी अटकेच्या जाळ्यात ओढलेले भांडुप येथील कुटुंब रस्त्यावर येता येता वाचले. दहशतवादी कृतीत थेट सहभाग निष्पन्न झाल्याची भीती घालून भामट्यांनी या कुटुंबाकडून ४० लाख उकळले. पैशांची पुढील मागणी पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने घर विकण्याचा निर्णय घेतला; मात्र हा निर्णय प्रत्यक्षात उतरण्याआधीच फसवणूक सुरू असल्याची कुणकुण लागल्याने कुटुंब सावध झाले.
भांडुप येथे राहणारे निवृत्त बँक व्यवस्थापक आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही घटना अलीकडेच घडली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा नोंदवण्यात आला. १० मार्च रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून ते दिल्ली एटीएस पथकाचा अधिकारी असल्याचे सांगितले. दिल्ली बॉम्बस्फोटात तक्रारदाराच्या सहभाग स्पष्ट करणारे पुरावे हाती लागले असून नोंद गुन्ह्यात अटक करीत आहोत, असे सांगत या व्यक्तीने तक्रारदाराला घाबरून सोडले.
तक्रारदाराच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांवर अडीच कोटींचे संशयास्पद व्यवहार घडले. ही रक्कम बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आल्याचा दावा ही व्यक्ती करू लागली. त्याने तक्रारदाराच्या नावे जारी अटक वॉरंट आदी कागदपत्रे पाठवल्याने ही व्यक्ती खरेच पोलिस आहे, असा भास तक्रारदाराला झाला.
पुढे या भामट्यांनी तथाकथित आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी सर्व जमापुंजी, गुंतवणूक सांगू त्या बँक खात्यावर वळवण्याची सूचना तक्रारदाराला केली. तपासात आरोप चुकीचा ठरल्यास ही सर्व रक्कम पुढील दोन दिवसांत परत केली जाईल, असे सांगत तक्रारदाराला आश्वस्त केले गेले. त्यानुसार तक्रारदाराने तीन लाख रुपये जमा केले.

शेअर विकले, कर्ज घेतले
तातडीने भामट्यांच्या खात्यात वळवले. शेअर विकून २८ लाख तर पत्नीच्या नावे कर्ज घेत १० लाख जमा केले. भामट्यांनी राहते घरही विकावे लागेल, असे तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने तशी तयारीही सुरू केली; मात्र तत्पूर्वीच अशाप्रकारे फसवणूक होते, याची माहिती मिळाल्याने तक्रारदाराने पोलिस ठाणे गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT