मुंबई

महामुंबईत उकाडा वाढणार

CD

महामुंबईत उकाडा वाढणार
हवामान विभागाचा इशारा; घामाच्या धारा कायम राहणार

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ६ : काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत चार ते पाच दिवस प्रचंड उकाडा आणि दमट हवामान राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रखर उन्हासोबतच घामाच्या धारांनी चिंब हाेणार आहेत.

​हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, मुंबईत ६ ते ९ मे या कालावधीत हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहील. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढणार आहे. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा जाणवणारी उष्णता अधिक असेल. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबईत ५ मे रोजी हवामान कोरडे होते; मात्र ६ मेपासून ९ मेपर्यंत सलग चार दिवस उष्ण आणि दमट स्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून, तर पालघरमध्ये ७ मेपासून उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
​कोकण किनारपट्टीवर उन्हाचा तडाखा असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात ७ आणि ८ मे रोजी दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

​​हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईतील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ हाेणार नसली तरी आर्द्रतेमुळे मुंबईकर हैराण होणार आहेत.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

Fish Farming : मच्छीमारीतून कोट्यवधींची कमाई! सरकारचा ९ हजार कोटींचा मोठा प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण योजना

SCROLL FOR NEXT